नोकर्‍या पहा


Check out लेटेस्ट बातमी

आयबीपीएस अंतर्गत प्रोबेशनरी अधिकारी पदांची एकत्रित भरती
इन्स्टिटयूट ऑफ बँकींग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) अंतर्गत बँकामध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदासाठी एकत्रित पद भरती प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.ibps.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय रिझर्व बँकेत अधिकारी पदाच्या १८२ जागा
भारतीय रिझर्व बँकेत अधिकारी पदाच्या (श्रेणी-ब) थेट भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये दिव्यांग संवर्गातील टेक्निशिअन/बी (रिसेप्शनीस्ट) पदांच्या २ जागा
भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये दिव्यांग संवर्गातील टेक्निशिअन/बी (रिसेप्शनीस्ट) पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जुलै २०१६ आहे. अधिक माहिती www.barcrecruit.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये कनिष्ठ हिंदी भाषांतरकाराच्या ८ जागा
भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये डीएईच्या कॉन्स्टिट्यूयंट युनिट्समध्ये कनिष्ठ हिंदी भाषांतरकाराच्या गट-ब पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट २०१६ आहे. अधिक माहिती www.barcrecruit.gov.in किंवा www.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तरुणांनो, अग्निशामक व्हा !
अग्निशमन दलामध्ये अग्निशामक म्हणून कारकिर्द करु इच्छिणाऱ्या तरुण-तडफदार पुरुष उमेदवारांकरिता राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातर्फे 06 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. पाठ्यक्रमाकरिता महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र असलेल्या व मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान एस.एस.सी. 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण खुल्या प्रवर्गासाठी व 45 टक्के उत्तीर्ण अनुसूचित जाती/ जमाती/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग/ इतर मागासवर्ग उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. या पाठ्यक्रमाकरिता दि. 15 जून, 2016 रोजी उमेदवाराचे वय 18 पेक्षा कमी व 23 वर्षापेक्षा जास्त असू नये. अनुसूचित जाती/ जमाती/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग उमेदवारांकरिता 05 वर्षापर्यंत व ओ.बी.सी. प्रवर्गातील उमेदवारांकरिता 03 वर्षांपर्यंत वयोमर्यादा शिथील करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज व पाठ्यक्रमाच्या अधिक माहिती http://www.mahafireservice.gov.in या संकेतस्थळावर दि. 15 जून, 2016 पासून उपलब्ध होईल.